व्यक्त व्हावं असं वाटलं आणि
व्यक्त होण्यासाठी ब्लॉगचं माध्यम निवडलं. काही बोलावं. काही लिहावं. काही सांगावं.
काही ऐकावं. हे करता करता आपल्यातलं माणूसपण गवसावं, एवढाच हेतू. आठवड्यातून एकदा त्यासाठी
आपल्या भेटीला येईल.
लिहायचं ठरलं. पण काय लिहावं? घनगंभीर
विषयांची एक यादीही मनात चमकली. मात्र त्याबरोबर ‘अभ्यासोनी प्रकटावे, नाही तरी झाकोनी
असावे’ हा संत रामदासांचा दंडुकाही मागोमाग आला. तेव्हा या नव्या माध्यमाची
स्वतःला सवय लावताना काहीतरी स्फुट लिहावं, असं सध्यातरी ठरवलं. निमित्त-प्रसंगांनी
येणारं, कधीतरी वाचलेलं, मनात घोळत राहणारं, दैनंदिन जीवनात निर्णय घेताना हे का ते
या घोळात टाकणारं, कधी विचारानं मार्ग दाखवणारं, कधी अतिविचारानं गुंता वाढवणारं.
असं काहीही लिहावं, मोकळं व्हावं!
आज ‘योग दिन’. ‘योग’ भारतीय
संस्कृतीला व्यापक आणि सखोल तत्वज्ञान, जीवनपद्धती देणारा एक राजमार्ग. हा मार्ग
अनुसरावा असा संकल्प अनेकवेळा होतो. योगशास्त्राचा दैनंदिन जीवनात व्यावहारिक
पातळीवर विचार करताना सहज मनात आलं, शरीर-मनाची सांगड घालावी हे योगाचं सांगणं.
जिथे आपण शरीरानी आहोत तिथं मनानी राहावं इतकंच मागणं. पण खरंच हे साधणं सहज आहे
का? अनुभवाला तर येतं हे सगळ्यात कठीण आहे. एका ठिकाणी बसलो तरी मन आपलं सगळीकडे
बागडून येतं. स्वतःचंच मन आणि आपलंच ऐकत नाही. असं जर होतं, तर इतरांनी आपलं ऐकलं नाही
म्हणून आपण तक्रार का करतो? आधी आपण आपलं ऐकावं, मग दुसऱ्यांना ऐकवावं. ‘आधी केले,
मग सांगितले’ या उक्तीत केवढा मोठा अर्थ अभिप्रेत आहे ना? हा अर्थ लक्षात आला की ‘सांगण्याचा
अधिकार प्राप्त होतो’, म्हणजे काय हे कळायला लागतं. कोणाचं तरी बोलणं प्रेरणेचा झरा, परिवर्तनाचा स्रोत का ठरतं आणि
बाकीच्यांचं शब्दांचं अवडंबर का वाटतं, यामागचं रहस्य उलगडायला लागतं.
हा अवघड वाटणारा योग साधण्यासाठीच,
महर्षी पतंजलींच्या योगशास्त्रातलं, समाधिपादातलं पहिलं सूत्र सांगतं, ‘अथ योगानुशासनम्’
! अनुशासन म्हणजे अभ्यास करणे, वापर करणे, अमलात आणणे. योगशास्त्राची परंपराप्राप्त शिकवण आचरणात आणायची. मुळातच
शासन, अनुशासन, शिस्त म्हणलं की मन बिथरतं. त्याच्या स्वातंत्र्यावरची बंधनं
त्याला सहन होत नाहीत. वास्तविक पाहता शिस्तीवर जीवनाची भिस्त असते. बेशिस्त होऊन
आयुष्याचे टक्के-टोणपे खाल्ले की तिचं महत्त्व कळायला लागतं. मात्र ही शिस्त
दुसऱ्याने कोणी लावली तर ती जाचक वाटते. दुसऱ्याचं पटत नाही आणि आपल्याला जमत नाही,
अशी स्थिती होते. या सगळ्या गदारोळातून स्वयंशिस्तच मार्ग दाखवू शकते. करडी शिस्त
लागावी पण काळ-परिस्थितीनुसार तिच्यात लवचिकताही ठेवावी. कवी मंगेश पाडगावकर तर
म्हणतात, ‘शिस्त गुणगुणता आली पाहिजे.’ अर्थातच शिस्तीतही स्वाभाविकता, सहजता, आनंददायीपण टिकलं पाहिजे. शिस्त
हा सहज स्वभाव व्हावा. तसं झालं की अनेकविध संधी सहजतेनं स्वीकारता येतात. विकासाच्या
वाटा खुल्या होतात.
‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ या
उक्तीनुसार दुसऱ्याच्या अनुभवातून शिकण्याची तयारी ठेवली तर आयुष्याला गती येते.
बंधनं पाळली तरच आयुष्याचं धन हातात येतं, अन्यथा निर्धन व्हायला वेळ लागत नाही.
गुरु-शिष्य परंपरेनुसार प्रचलित असलेल्या योगशास्त्राचं पहिलं सूत्र सांगतं,
प्रत्येक परंपरेतलं शहाणपण जोपासत आलं पाहिजे, तरच माणूसपण समृद्ध होतं. हे शहाणपण
जोपासण्यासाठी, माहितीच्या महापुरातही अनुभवाची जहाजंच तारून नेऊ शकतात. त्यामुळं
अनुभव गाठीशी बांधता आला पाहिजे. त्यासाठी समाजातली, कुटुंबातली अनुभवी माणसं
जोपासता आली पाहिजेत. ही परंपरा, हे अनुशासन मंगलतेकडे घेऊन जाणारी असेल, याची
खात्रीच ‘अथ’ हा मांगल्यवाचक शब्द देतो.
वृंदा आशय
Mastt
ReplyDeleteNice
DeleteAmazing 🙌🙌
ReplyDeleteIt's a treat for me to read your writing
ReplyDeleteCongratulations mam
🌼
खूप छान लेख
Delete👏amazing
ReplyDeleteKeep it up .. waiting for next
ReplyDeleteKharach. Adhi pn amlat anayla pahije.
ReplyDeleteGood blog 👍
Superb 👏👏
ReplyDeleteWorth reading blog...
ReplyDeleteखुप सुंदर मॅडम.
ReplyDelete🙌👌
ReplyDeleteChhan lihilay vrunda madam..
ReplyDeleteखुप छान लिहलय मॅम
ReplyDeleteKhupach chhan mam
ReplyDeleteसुंदर लिखाण. व्यक्त होतांना ‘पण काय लिहावं?’ हा प्रश्न स्वाभाविक आहे. मात्र चिंतन करणाराला सुचत जातं. पुढील लिखाणा करता शुभेच्छा!
ReplyDeleteNice
ReplyDeleteखुप छान लिहिल!खुप खुप अभिनंदन.
ReplyDeleteआपण खूप छान लिहिले आहे मॅडम
ReplyDeleteखूप अप्रतिम आहे!!!🙏
Khup chan👌
ReplyDeleteखूपच छान लिहिले वृंदा मॅडम खूप खूप अभिनंदन!!
ReplyDeleteपुढिल लिखानासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!
खूप छान..
ReplyDeleteExcellent writing.
ReplyDeleteNice mam
ReplyDeleteSundar lekh. keep it up. My younger son read you book on poems for kids 4 times in a day.
ReplyDeleteखूप सुंदर... अशीच व्यक्त होत रहा.... audio छान .. effective
ReplyDeleteछान, वाचनीय, शुभेच्छा
ReplyDelete